Monday, August 16, 2010

जगप्रसिद्ध नागपंचमी शिराळ्यात शांततेत

जगप्रसिद्ध नागपंचमी शिराळ्यात शांततेत
सकाळ वृत्तसेवा
Sunday, August 15, 2010 AT 12:15 AM (IST)


शिराळा - येथील जगप्रसिद्ध नागपंचमी लाखावर नागभक्‍त व पर्यटकांच्या उपस्थितीत आज उत्साह व शांततेत झाली. पावसाने उघडीप दिल्याने पर्यटकांना उत्सवाचा आनंद चांगल्या प्रकारे घेता आला.

65 नागराज मंडळांनी पकडलेले नाग शनिवारी सकाळी 6 ते 10 दरम्यान अंबामाता मंदिरात सवाद्य मिरवणुकीने नेऊन पूजा करण्यात आली. नागराज मंडळांनी घरोघरी नेलेल्या नागांची महिलांनीही पूजा केली.

साडेअकरापासूनच मिरवणुकीसाठी नागराज मंडळे बाहेरी पडली. दुपारी दीड वाजता कोतवाल मंडळींनी पकडलेल्या जिवंत नागांची पूजा प्रमोद महाजन, सुनील महाजन, भास्कर महाजन यांच्या घरी करण्यात आली.

मानाची पालखी गुरुवारपेठ, कुरणे गल्ली, सोमवार पेठेतून अंबामाता मंदिराकडे नेण्यात आली. पालखी सर्व नागराज मंडळांच्या अग्रभागी होती. सोबत 65 नागमंडळे होती. अंबामातेच्या दर्शनानंतर पुन्हा पालखी महाजनांच्या घरी आली.

आरोग्य विभागाने सर्पदंशावरील 576 लशींची सोय केली होती.

No comments:

Post a Comment