Sunday, August 15, 2010

सांगली जिल्हा

सांगली जिल्हा

सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण भागात व काहीसा आग्नेयेस वसला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश, कृष्णाकाठचा सुपीक व सखल मैदानी प्रदेश आणि पूर्वेकडील पठारी प्रदेश अशी या जिल्ह्याची स्वाभाविक रचना आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा, वारणा, अग्रणी, माण व बोर या प्रमुख नद्या आहेत. सांगली जिल्ह्याच्या आग्नेय भागात दंडोबाचा डोंगर, वाळवे तालुक्याच्या दक्षिण भागात मल्लिकार्जुन डोंगर, तासगाव तालुक्यात कालभैरव डोंगर, खानापूर तालुक्यात होनाई डोंगर, तर आटपाडी तालुक्यात शुक्राचार्याचा डोंगर असे डोंगर जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात देवराष्ट्रे येथे सागरेश्वर व शिराळा येथे चांदोली अशी दोन अभयारण्ये आहेत.

जिल्ह्यात हवामान बहुतांशी कोरडे असून उन्हाळा सौम्य असतो. जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण अधिक असून पूर्वेकडे ते कमी कमी होत जाते. जत, आटपाडी व कवठेमहांकाळ हे तालुके रब्बी ज्वारीसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. कृष्णाकाठच्या सखल व सुपीक प्रदेशात गहू पिकवला जातो. व शिराळा तालुक्यात भाताचे पीक अधिक आहे.

हळदीच्या उत्पन्नासाठी सांगली जिल्हा पूर्वापार प्रसिद्ध आहे. ऊस व द्राक्षे ही जिल्ह्यातील बागायती पिके आहेत.

No comments:

Post a Comment